Nana Patekar-Kiran Mane | नाना पाटेकर यांनी किरण मानेंना फटकारलं; म्हणाले – ‘राजकीय भूमिका कशाला हवी?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patekar-Kiran Mane | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘समाज माध्यमांवर राजकीय भूमिका मांडल्याबाबत आपल्याला काढण्यात आल्याचा आरोप खुद्द किरण माने यांनी केला आहे. तर, गैरवर्तनामुळं त्यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्टीकरण निर्मात्यांने केलं आहे. यानंतर किरण मानेने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही (Sharad Pawar) भेट घेतली होती. यानंतर आज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Nana Patekar-Kiran Mane)

 

पुण्यात (Pune News) माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, किरण माने प्रकरणाबद्दल विचारलं असता त्यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. ”आजूबाजूला काय चुकीचं चाललंय याचं मला काही देणंघेणं नाही. मी माझं काम करत राहतो. माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी? समाजाप्रती भूमिका काय आहे ते महत्त्वाचं आहे. काम करत राहायचं आणि एक दिवस कापरासारखं विरून जायचं,” असं नाना म्हणाले. (Nana Patekar-Kiran Mane)

दरम्यान, नाना पाटेकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांच्या ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटावरुन देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या वादात नाना पाटेकर यांनी कोल्हेंची बाजू घेतली आहे. ”अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 30 वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. याचा अर्थ मी त्याचं समर्थन करत नाही. समर्थन करत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. भूमिका करणं हे माझं उपजीविकेचे साधन, यात माझी चूक आहे का ? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही,” असं देखील त्यांनी विरोधकांना फटकारलं.

 

Web Title :- Nana Patekar-Kiran Mane | kiran mane controversy why should we have political stand asks nana patekar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा