Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lata Mangeshkar | भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून जगभरातील लाखो चाहते लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. लाडकी गायिका आणि स्वर कोकिळा लवकर बरी होवो हीच प्रार्थना भारतीवासीय करीत आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Singer Lata Mangeshkar is still in the ICU ward but there has been a slight improvement in her health today: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U5PkbWGp3T
— ANI (@ANI) January 22, 2022
‘एएनआय’ने शनिवार (22 जानेवारी 2022) रोजी 12.31 वाजता ट्विट केलं आहे. या माहितीनुसार, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं आहे. त्या आयसीयूमध्ये (ICU) आहेत. दरम्यान लतादीदींच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये (Breach Candy Hospital, Mumbai) लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतुत समदानी (Dr Pratit Samdani) यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कुटुंबियांनी (Lata Mangeshkar’s Family) लतादिदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं असल्याची माहिती अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Iyer) यांनी काल दिली होती. यानंतर आताच्या समोर आलेल्या माहितीनूसार लतादीदींच्या प्रकृतीत थोडीसी सुधारणा झाली आहे.
Web Title : Lata Mangeshkar | Singer Lata Mangeshkar is still in the ICU ward but there has been a slight improvement in her health today: Dr Pratit Samdani, who’s treating her at Mumbai’s Breach Candy Hospital
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का