
Nana Patole | प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘ते भाजपसाठी…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. शनिवारी नांदेड येथे सभेत बोलताना काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. नांदेडकर आणि लातूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मांडीवर बसायला तयार असल्याची टीका आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहेत. ते भाजपचे (BJP) प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, आपल्या राज्यात एक चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर भाजपचे प्रवक्ते झाले आहेत, असे त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं. ते भाजपसाठी काम करत आहेत. काँग्रेसमधून कोणीही सोडून जाणार नाही, असा दावा पटोले यांनी केला. महाराष्ट्रात ईडीचं भाजप प्रणित सरकार आहे. महिलांचा सन्मान न ठेवणे हा भाजपचा धर्म आहे, अशी टीकादेखील पटोले यांनी केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
काँग्रेसमधील नैतिकता संपली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील (Maharashtra Legislative Assembly)
16 जण बरखास्त झाले तर नांदेडकर आणि लातूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत.
ते देवेंद्र फडणवीस यांना मस्का लावायला तयार आहेत. आमचं काहीच शिल्लक राहिलेलं नाही,
असे काँग्रेसवाले मला म्हणत आहेत. आम्हाला लोकांना उत्तरं देता येत नाहीत, असे म्हणतात.
त्यामुळे जे राहिलेलं आहे वाचवुया अशी स्थिती काँग्रेसची झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
Web Title :- Nana Patole | nana patole said prakash ambedkar is bjp b team
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक