Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole Taunt To Ajit Pawar | सत्तेत अशी व्यवस्था असू नये ज्यामुळे देश उद्ध्वस्त होईल. त्यामुळे भाजपच्या (BJP) विरोधात सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. तसेच जे भाजपच्या विरोधात आहेत त्यांना सोबत घेऊ. आमची ही स्पष्ट भूमिका आहे. आज देशात हाहाकार माजला आहे. कोणीही खुश नाही. मी महाराष्ट्र काँग्रेसचा (Maharashtra Congress) प्रदेशाध्यक्ष असल्याने भूमिका मांडत आहे. देशातलं अराजक थांबवायचं असेल तर भाजपच्या विरोधात मोठी आघाडी होणं आवश्यक असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं. (Nana Patole Taunt To Ajit Pawar)
मी दादा नाही…
माझं नाव नाना आहे दादा नाही. आपल्याकडे कुटुंब प्रमुखाला नाना म्हटले जाते. मी त्याच भूमिकेत आहे, पक्ष पुढे घेऊन जातो आहे. मात्र काहीजण माझ्यावर आरोप करतात की मी दादागिरी करतो. मात्र मी दादा नाही तर नाना आहे. राजकारणात आम्ही विजयाची घोडदौड कायम ठेवू आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ असंही नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी हा टोला अजित पवारांना लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Nana Patole Taunt To Ajit Pawar)
जागावाटपाचा निर्णय झालेला नाही
अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार असून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आल्याची चर्चा आहे. या संदर्भात नाना पटोले यांना विचारले असता, जागावाटपाचा कुठलाही निर्णय मविआने घेतलेला नाही. हवाई पुलाव असलेल्या बातम्यांवर लक्ष देऊ नका असंही पटोलेंनी सांगितले. तसेच लवकरच दिल्लीला जाणार असून हायकमांडसोबच चर्चा करुन महाराष्ट्रात काय करायचं याचा निर्णय घेऊ असंही पटोले म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत…
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा प्रस्ताव आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही
बोलणार नाही. त्यांची चर्चा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत सुरु आहे.
मागच्या वेळचा अनुभव घेता आम्ही त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय काही भूमिका घेणार नाही.
उद्धव ठाकरे यांना देखील आम्ही हेच सांगतलं आहे. तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करा परंतु
तुम्ही त्यांच्याकडून प्रस्ताव मागवा असंही पटोले यांनी सांगितलं.
Web Title :- Nana Patole Taunt To Ajit Pawar | my name is nana not dada nana patole taunt to ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update