Nana Patole | ‘…तर नवाब मलिक यांना मंत्री राहण्याचा कोणताही अधिकार नाही’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nana Patole | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणामुळे ED च्या कोठडीमध्ये आहेत. नवाब मलिक गेल्या 23 फेब्रुवारीपासून तुरूंगात आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही (Maharashtra Budget Session) विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. ­­अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मलिकांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

 

नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत मात्र अद्याप ते आरोप काही सिद्ध झाले नाहीत. जर न्यायालयात मलिकांचे दाऊदसोबत संबंध असल्याचे आरोप असल्याचं सिद्ध झाले तर निश्चितच त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

भाजपचं (BJP) वर्तन जे काही आहे म्हणजे कोणावरही आरोप करत त्याला बदनाम करायचं ही राजनीती त्यांनी वापरली आहे. त्यांच्यावर कोण विश्वास (Trust) ठेवणार?, मात्र तुमच्या पक्षाच्या नेत्याचे तर इक्बाल मिरचीसोबत आर्थिक व्यवहाराचे संबंध आहेत मग काय तुमचा पक्ष विसर्जित करणार का?, असा सवाल करत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

दरम्यान, भाजप राष्ट्रवादी आणि सरकारवर टीका करत आहे.
मात्र भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये (NCP) आलेल्या एकनाथ खडसेंनीही (Eknath Khadse) भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
भाजपला इक्बाल मिरचीने फंड पुरवला होता. इक्बाल मिरची (Iqbal Mirchi) हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
त्यासोबतच भाजप नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये (Nashik) दाऊदच्या नातेवाईकासोबत जेवण केलं
म्हणजे त्यांचा दाऊदच्या नातेवाईकासोबत संबंध आहेत असं म्हणता येईल का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Nana Patole | ‘… then Nawab Malik has no right to be a minister’; Nana Patole’s big statement!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Savings Schemes | पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी खात्यात 31 मार्चपर्यंत करावे लागेल हे काम, अन्यथा बंद होऊ शकते अकाऊंट

 

Pune Crime | काय सांगता ! होय, इंदापूर तालुक्यात अफुची शेती

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी बंपर गुड न्यूज ! 31 मार्चपासून 90,000 रुपयांपर्यंत वाढेल सॅलरी, 3% वाढेल महागाई भत्ता