Nanded Crime | 4 वर्षापासून दोघांचं ‘झेंगाट’ ! ‘नकार’ समजताच प्रियकरानं घरात घुसून केलं ‘काम’ तमाम

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड शहरातील (Nanded Crime) शारदानगर झेंडा चौक येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरात घुसून प्रियकराने तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून (Murder) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली. त्यामुळे नांदेड शहरात (Nanded Crime) एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी घटनास्थळावरून पळ काढताना ताब्यात घेतले.

 

वैष्णवी संजय सिंह Vaishnavi Sanjay Singh (वय 22) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सुरेश शेंडगे  Suresh Shendge (वय-26 रा. पांगरी, ता.जि. नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवी आणि सुरेश या दोघांचे काही वर्षापासून प्रेम प्रकरण असल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी (vimantal police) दिली. या प्रेमीयुगुलांचे काही कारणामुळे प्रेमसंबंध तुटले होते. याच कारणावरून आरोपी सुरेश शेंडगे याने वैष्णवी घरात एकटी असताना संधी साधून धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करुन खून केला.

 

घटनेची माहिती मिळवतात उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख (Sub-Divisional Police Officer Chandrasen Deshmukh), विमानतळ पोलिस ठाण्याचे (vimantal police station) पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे (Police Inspector Aniruddha Kakade), सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदास गीते, दारासिंग राठोड, बाबा गजभारे, दत्ता गंगावरे महिला पोलिस कर्मचारी मनीषा गजभारे यांनी घटनास्थळी धाव (Nanded Crime) घेतली. त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या बेतात असताना अंगावर रक्ताचे डाग बघून आरोपीला ताब्यात घेतले. सुरेश शेंडगे व वैष्णवी कौर यांचे मोबाईल ताब्यात घेतले असून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे. वैष्णवी ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

Web Title :- Nanded Crime | love affair for 4 years boyfriend murder his girlfriend in nanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan arrest case | ‘समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे…’, वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपानंतर भाजपची सावध भूमिका

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारली ‘बाजी’, जाणून घ्या