‘या’ नेत्याला मोदींची स्तुती करणं पडलं महागात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरच्या कामगार क्षेत्रात मोठ्या आदराने ज्यांचे नाव घेतले जाते व ज्यांनी कामगारांच्या घरासाठी देशात आदर्श ठरेल असा प्रकल्प उभा करणारे माजी आमदार नरसय्या आडम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करणं चांगलच महागात पडलं आहे. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीतून निलंबित करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये माकपच्या राज्य समितीची बैठक होणार असून त्यात आडम यांना राज्य सचिवपदावरुनही हटवले जावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

ट्रम्प भारतावर रुसले ? भारताकडून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा (GSP) काढून घेतला 

जानेवारी महिन्यात सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विडी कामगारांच्या घरांचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता. तेव्हा डाव्या कामगार संघटनांचे नेते म्हणून आडम मास्तर व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभात बोलताना आडम यांनी मोदी यांची प्रशंसा केली होती. पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच गरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच या घरांचे वाटप केले जाईल, असेही आडाम यांनी म्हटले होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नरसय्या आडम हे तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्याचा पराभव केला होता.