Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर येथून अटक केली होती. तेव्हा नारायण राणे (Narayan Rane) रायगड येथे जनआशीर्वाद यात्रा करत होते.

 

त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना अटी शर्थींवर जामीन मंजूर केला होता. राणेंचा (Naryaan Rane) हा खटला महाड न्यायालयातून अलिबाग जिल्हा न्यायालयात वर्ग झाला आहे. आज (१ डिसेंबर) या खटल्याची सुनावणी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह वकिलांची फौज आहे.

 

२४ ऑगस्ट रोजी एका ठिकणी भाषणात बोलताना उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.
“आपल्या मुख्यमंत्र्याला जर भारताच्या स्वातंत्र्याचं वर्ष माहीत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे वर्ष विचारण्यासाठी मागे पाहिले.
मी जर तिथे असतो, तर तिथेच त्यांच्या कानाखाली लावली असती”, असे नारायण राणे म्हणाले होते.

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश

Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ