Narayangaon Crime | शेजाऱ्यांच्या भांडणाला वैतागून महिलेची आत्महत्या, नारायणगावातील दुशिंग कुटुंबातील 5 जणांना अटक झाल्याने प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नारायणगाव (Narayangaon Crime) येथे घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी (Pune Rural Police) शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला होता. आरोपींना आज (बुधवार) सायंकाळी अटक (Arrest) करण्यात आली आहे. नारायणगाव (Narayangaon Crime) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अनिता संभाजी पडवळ (रा. अष्टविनायक रेसिडेन्सी, खोडद रोड, नारायणगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अनिता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रविण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व रा.रा. अष्टविनायक रेसिडेन्सी, खोडद रोड, नारायणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत अनिता पडवळ हे अष्टविनायक रेसिडेन्सी (Ashtavinayak Residency) येथे एकमेकांच्या शेजारी राहण्यास होते. आरोपी हे अनिता यांना वेळोवेळी टोमणे मारुन मानसिक त्रास देत होते. भांडणातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अनिता यांनी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून (Suicide note) पाटे खैरे मळा येथील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

याप्रकरणी विशाल संभाजी पडवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सायंकाळी आरोपींना अटक करण्यात आली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate)
यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गुलाबराव हिंगे पाटील (Gulabrao Hinge Patil) करीत आहेत.

Web Title :- Narayangaon Crime | woman suicide after quarreling with neighbors crime, Narayangaon police arrest 5 from pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NPS | राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सबस्क्रायबर्ससाठी मोठी बातमी ! आता एन्युटी सरेंडरच्या बाबतीत PFRDA च्याशिवाय निकाली काढतील विमा कंपन्या

Pune Corporation | कचरा संकलनासाठी नागपूर मनपाने नेमलेल्या कंपन्यांचे कर्मचारी, अधिकार्‍यांची ‘अरेरावी’; पुणे मनपातील सत्ताधारी ‘खाजगी कंपन्या’ नेमणार !

Konkan Flood | पुरग्रस्तांना तुर्तास तातडीची 10 हजारांची मदत, पंचनाम्यानंतर मोठं ‘पॅकेज’