PM नरेंद्र मोदी राज्यसभेत ‘कडाडले’ ; ‘या’ आहेत भाषणातील १० महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये राज्यसभेत केलेल्या आपल्या भाषणात झारखंडमधिल हिंसाचारापासून ते बिहारमधील ‘चमकी’ तापापर्यंत सर्व मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवरही विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर सरकार गरिबांचा कल्याण आणि देशाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्र्यांनी म्हटले की राज्यसभेत आमच्याकडे पुरेसे बहुमत नसल्यामुळे काही विधेयके येथे पारित होऊ शकत नाहीत. मागच्या ५ वर्षांच्या कालावधीत सरकार काही निर्णय घेऊ शकलेले नाही कारण विधेयके लोकसभेत पारित होऊनही बहुमताच्या अभावी राज्यसभेत पारित होऊ शकले नाहीत त्यामुळे सरकारचा वेळ आणि जनतेचा पैसे वाया जातोय.

पंतप्रधानांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

१. काँग्रेसला हार सहन होत नाही
मोदी म्हटले की काँग्रेसचा नेहमी काही ना काही प्रॉब्लेम असतोच. त्यांना विजयही पचवता येत नाही आणि हारही स्वीकारता येत नाही. काँग्रेसने निवडणुकीदरम्यान वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर व्हीव्हीपॅट वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले मात्र याने ईव्हीएम ची ताकद आणखीनच वाढली.

२. मीडिया विकाऊ आहे का
मोदी म्हणाले, ‘असेदेखील बिनबुडाचे आरोप केले जातात कि मीडिया विकला गेलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही निवडणूक जिकली. ज्या राज्यांमध्ये आमचे सरकार नाही तेथेही हेच लागू होणार का ? तामिळनाडू आणि केरळमध्येही असेच आहे का ?’

३. काँग्रेस म्हणजेच देश नाही
मोदी म्हणाले निवडणुकीत देश हारला, लोकशाही हारली असे म्हटले जाते तर वायनाड आणि रायबरेली मध्येही भारत हारला का ? काँग्रेस हारली तर सारा देश हरला असा गळा काढला जातो, हा कोणता तर्क आहे ? काँग्रेस चा अर्थ देश नाही. तसे कोणी समजू नये.

४. आम्ही सरदार पटेल यांचा सन्मान केला
सरदार पटेल देशाचे पहिले प्रधानमंत्री असते तर आज काश्मीरची समस्या नसती. त्यांनी ५०० राज्यांना एकत्र करत संपूर्ण भारत एकसंध केला यात कोनतेही दुमत नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत सरदार काँग्रेसचे असूनदेखील आम्ही गुजरातमध्ये त्यांची सर्वात मोठी प्रतिमा उभारली.

५. आसाम मध्ये एनआरसी लागू करण्याचे क्रेडिट काँग्रेस ने घ्यावे
प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले की राजीव गांधी यांनी आसाम करारामध्ये एनआरसी चा स्वीकार केला होता, याचेही क्रेडिट काँग्रेसने घ्यावे. त्यांनी म्हटले कि अशी धरसोड चालत नाही. सुप्रीम कोर्ट च्या आदेशानुसार आम्ही एनआरसी लागू करण्यास कटिबद्ध आहोत.

६. बिहार मधील चमकी ताप शरमेची आणि दुःखाची गोष्ट
या मुद्द्यावर पंतप्रधानांनी म्हटले कि बिहारमधील हि गोष्ट अत्यंत शरमेची आणि दुःखाची बाब आहे. हि गोष्ट आपल्याला गंभीरपणे घ्यायला हवी. अमी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या सतत संपर्कात असून आपले आरोग्यमंत्री पण याकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

७. पूर्ण झारखंड ला दोषी मानने चुकीचे
झारखंड ला हिंसेचा अड्डाच बनवल्याचे बोलले जात आहे. युवकांच्या हत्येचे मला दुःख आहे आणि सर्वांना असले पाहिजे. अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यासाठी संपूर्ण राज्यालाच शिक्षा देणे आपल्याला शोभत नाही. मग तर आपल्याला तिथे चांगले काम करणारे लोकदेखील मिळणार अहित.

८. न्यू इंडिया चा हि विरोध केला जातोय
पंतप्रधानांनी म्हटले की न्यू इंडिया चा देखील विरोध होतोय. काही गोष्टी चुकीच्या असू शकतात हे मान्य मात्र सर्व काही चुकीचे असू शकत नाही. त्यांनी म्हटले की ओल्ड इंडिया ची मागणी होतेय, असे का ? प्रगती नको आहे का ?

९. पहिल्या सरकारच काम फक्त फिती कापून काम सुरु करणे हे होते.
याआधीच्या सरकारच काम फक्त दिवा पेटवणे आणि फिती कापणे हेच होते. काम पूर्ण करण्याकडे कधीच लक्ष पुरवले गेले नाही. गरिबांसाठी आम्हीदेखील घरे बनवली आणि याआधीही बनवली जात होती मात्र आम्ही १.५ कोटी बनवली आणि काँग्रेसने २५ बनवली हा फरक आहे.

१०. विरोधक तर प्रत्येकच गोष्टीला विरोध करत आहेत
आधारचा विषय असेल, ईव्हीएम किंवा इतर विकासाचा मुद्दा असेल विरोधकांनी आपल्या नावातील विरोध हा शाबीत सार्थ करत प्रत्येकच गोष्टीचा विरोध करणे चालवले आहे.