Naresh Mhaske | खरे शिवसैनिक असते, तर त्यांनी महाविकास आघाडी तोडलीच असती – नरेश म्हस्के

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) हिंगोलीच्या सभेत वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वादंग सुरु आहेत. भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत. त्यावर आता शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरे शिवसैनिक असते, तर आतापर्यंत महाविकास आघाडी तोडली देखील असती, असे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले आहेत.

 

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तुटू शकते बोलण्यापेक्षा महाविकास आघाडी तोडा. खरे शिवसैनिक असते, तर आतापर्यंत महाविकास आघाडीतून बाहेर पडले असते. राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे होते, पुतळे जाळले पाहिजे होते. मनीशंकर अय्यर (Manishankar Ayyar) यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. मात्र हे आता शांत बसले आहेत, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्यांनी सावरकरांचा विषय काढून चूक केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यावर म्हस्के यांनी पडू शकते म्हणण्यापेक्षा पाडा, असे म्हंटले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप आणि शिंदे गटावर भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीत फूट पडणे हे भाजपसाठी चांगले आहे. त्यांना आगामी निवडणुका सोप्या जाऊ शकतात.
त्यामुळे त्यांनी सावरकरांचा मुद्दा उचलून धरला आहे.
जेणेकरुन शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (INC) वेगळी होईल, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

 

Web Title :- Naresh Mhaske | shinde group spokesperson naresh maske criticized the thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना