Nashik Bhadrakali Crime | घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांकडून अटक, दोन गुन्हे उघडकीस

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Bhadrakali Crime | नाशिक शहरातील रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका कॉलेजमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांनी (Nashik Bhadrakali Police) अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. इम्रान हानीफ पठाण (वय-28 रा. साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नाशिक शहरात दिवसा व रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी दिले होते. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत होते. भद्रकाली पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक पद्धतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बाबत माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी इम्रान पठाण याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच एक महिन्यापूर्वी रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका या कॉलेजमधील कार्यालयाच्या बंद दाराचे कुलूप तोडून घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून 23 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, पोलीस अंमलदार सतीश साळुंके, कय्युम सैय्यद, अविनास जुंद्रे, नितीन भामरे, निलेश विखे, दयानंद सोनवणे, नारायण गवळी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक, आरोपीवर MPID

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त