Nashik Crime | नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी (Shivsena Worker) निलेश उर्फ बाळा कोकणे (Nilesh alias Bala Kokane) यांच्यावर सोमवारी (दि.18) रात्री प्राणघातक हल्ला (Attack) झाला आहे. सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीवरुन एमजी रोडवरुन (MG Road) जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केले. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील (Sarkarwada Police Station) खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. एकीकडे राज्यात शिवसेना (Nashik Shivsena) व शिंदे गट यांच्यात घमासान सुरु असताना नाशिकच्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Nashik Crime)

 

बाळा कोकणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली (Bhadrakali Police Station), सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. फरार आरोपींचा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. हा हल्ला नेमका कोणी व का केला, हे अद्याप समजू शकले नाही. या हल्ल्यात कोकणे थोडक्यात बचावले आहेत. (Nashik Crime)

 

दरम्यान बाळा कोकणे यांच्यावरील हल्ल्यासह शहरातील इतर राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना कार्यालय, खासदार निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nashik Crime | attack on shiv sena leader bala kokane of nashik crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)