Nashik Crime News | वसुलीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, कामगाराची बाईक घेऊन आरोपींनी काढला पळ; नाशिकमधील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | मागच्या आठवड्यात नाशिकच्या पंचवटी परिसरात गोळीबार (Firing) झाल्याची घटना ताजी असताना आता नाशिकमधील सातपूर परिसरात गोळीबार झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे परिसरातील व्यवसायिक व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे (Nashik Crime News) गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाच धाक राहिला नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात हा गोळीबार करण्यात आला आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
हा गोळीबार वसुलीच्या वादातून घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या समजत आहे. सविस्तर माहिती अशी कि, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात महिंद्रा सोना कंपनी समोर दोन कार एकमेकांसमोर आल्यानंतर एकाने गोळी झाडली. भर दिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आपसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार केले. यानंतर आरोपीने आपली कार घटनास्थळी ठेवून त्या ठिकाणी असलेल्या एका कामगाराला हत्यारांचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Nashik Crime News)

 

रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून ( एमएच 04 ईएक्स 5678 ) ने प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (एमएच15 डीएम 7639) या वाहनातून आला. त्याने तपनच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत तपनवर गोळीबार करत कोयत्याने वार केले आणि घटनास्थवरून पळ काढला.

यानंतर तपनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
यानंतर आरोपींनी आपली गाडी बंद पडली म्हणून त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला बंदूक अन् कोयत्याचा
धाक दाखवत त्याची (एमएच 15 एफयू 7656)  दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा, सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

 

Web Title :- Nashik Crime News | Due to dispute over recovery, the youth was stabbed with a spear, the accused took the worker’s bike and ran away; Incident in Nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’

Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…