Nashik Crime | पोलीस भरती परीक्षेत अपयश आल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; परिसरात खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाने परीक्षेत (Police Recruitment Exam) मार्क्स कमी मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Crime) घडली आहे. परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने एका 22 वर्षाच्या तरुणाने विषारी औषध (Poison) प्राशन करुन आत्महत्या (suicide) केल्याची घटना नाशिक (Nashik Crime) मधील सिडकोत (CIDCO) घडली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

राहुल भानुदास चौगुले Rahul Bhanudas Chowgule (वय-22 रा. एक्सलो पॉईंट, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चौगुले याने मागील आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. या परीक्षेत नापास (Failure) झाल्याने राहुल याला नैराश्य आले.
याच नैराश्येतून त्याने शनिवारी (दि.20) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन (Nashik Crime) केले.

 

त्यानंतर राहुलला उलट्या आणि अन्य त्रास होऊ लागल्याने त्याच्या वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परंतु उपचार सुरु असताना रविवारी (दि.21) सकाळी त्याचा मृत्यू झाला.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी (Senior Police Inspector Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

Web Title :- Nashik Crime | suicide of a youth due to failure in police recruitment exam Ambad Police Station marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा