Nashik MNS | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला ‘धक्का’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने (Shivsena) जास्तीत जास्त महानगरपालिका (Municipal Corporation) आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. असे असतानाच नाशिक जिल्ह्यात (Nashik MNS) शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश (Nashik MNS) केला. हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी नाशिकसह, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि ग्रामीण भागातील युवकांनी मनसेत प्रवेश (Nashik MNS) केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास तांबे पाटील व अल्तमश शेख, उपजिल्हाप्रमुख संदीप दळवी, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास जाधव, मागील निवडणुकीत (election) पराभूत झालेले भाजपचे (BJP) उमेदवार याग्निक शिंदे, विकास काळे, माजी विभागप्रमुख तुषार मटाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला.

 

बदल नक्की दिसेल

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये बदल नक्कीच दिसून येईल. भ्रष्टाचार, बेरोजगारी व तीन वेगवेगळ्या दिशेला तोंड असलेलं सरकार यामुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आशादायक चित्र निर्माण होईल. तरुणाईचा ओढा हा राज ठाकरे याच्याकडे आहे. वेगवेगळ्या पक्षातून कर्यकर्ते प्रवेश करत आहेत. आम्ही पक्ष फोडण्याचे काम करत नाही. मुंबईत देखील अनेक कर्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितली.

 

Web Title :- Nashik MNS | nashik hundreds of shiv sainiks join mns in the presence of raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा