नाशिकमध्ये डॉक्टरांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कर्तृव्य पार पाडत आहे. डॉक्टरांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. पण, नाशिकमध्ये डॉक्टरावर हात उचलण्याची घटना घडली आहे. सिडकोच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

सिडकोतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोविड-19 संशयित रुग्णाचा काल मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेची वाच्यता झाली.नातेवाईकांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले आणि रिपोर्ट दाखवत रुग्णाचा मृत्यू का झाला याची विचारणा केली. डॉक्टर नेमके कारण हे समजावून सांगत होते. पण, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण सुरू केली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलीस याप्रकरणी चौकशी सुरू केली. पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर आज अंबड पोलीस ठाण्यात 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like