भाजपला धक्का ! शिवसेनेने नाशिक जिल्हा परिषदेवर फडकवला ‘भगवा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने नाशिक जिल्हा परिषदेतून काढता पाय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. भाजपने ऐन वेळेवर दोनीही पदांमधून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

राज्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदमध्येही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसत आहे. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठींबा दिल्याने भाजपला माघार घ्यावी लागली आणि नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेने भगवा फडकवला.

कोल्हापूर जिल्हा परिषद देखील भाजपने गमावली
दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झालीय.

महाविकासआघाडीचा पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील लागू केल्याने भाजपला चांगलाच धक्का बसताना दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर भाजपचा एवढा बलाढ्य संपर्क नाही गेल्या वेळेस राज्यात सरकार आल्याने भाजपने आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता भाजपला एका मागोमाग एक असे धक्के बसताना दिसत आहेत.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/