चक्क स्वर्गरथ घेऊन रस्त्यावर अवतरले ‘यमराज’, म्हणाले – ‘मास्क लावा..घरातच थांबा !’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला आहे. मुंबई , पुणे या मोठ्या शहरांसह कोरोना आता छोट्या शहरात आणि गावागावात देखील पोहचू लागला आहे. एवढं सगळं असूनही प्रशासन वारंवार घरात राहण्याचे आवाहन करीत असून देखील काही नागरिक ऐकण्याचं नावाचं घेत नाहित. मग अशा नागरिकांना शहाणपण शिकवायला चक्क यम देवच धरतीवर अवताराला आहे.

होय ! जळगावाव जिल्ह्यातील नशिराबाद या ठिकाणी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकंना समजावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील प्रमुख रस्त्यावर स्वर्गरथ फिरवत कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत जनजागृती संचलन केले. या संचलनात यमाचा समावेश होता. या अनोख्या संचलनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

या संचालनादरम्यान कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी घरातच थांबा. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा. मास्क लावा, रुमालाचा वापर करा, अशा विविध घोषणा देत यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास उद्भवणाऱ्या समस्यांबाबत यमाच्या वेशात कर्मचाऱ्यांनी भावनिक साद घातली. तर कोरोणााला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

या जनजागृती रॅलीत संतोष रगडे, पराग बराठे, विनोद चिरावंडे, दीपक नाईक, भास्कर माळी, ललित भोळे आदींसह कर्मचाऱ्यांनी रॅलित सहभाग घेतला.नियम पळाले नाहीत तर यमासोबत जाण्याची तयारी ठेवा अशा सूचना देत अनोखी जनजागृती करण्यात आली.