मांडूळ विक्री प्रकरणात मुंबईतील सहाय्यक निरीक्षकासह पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास नाशिक पोलिसांकडून अटक, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्वी पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीस असणाऱ्या एका मुंबईतील सहायक निरीक्षक आणि पुण्यातील चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नाशिक शहरात मांडूळ तस्करी प्रकरणात पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तो कर्मचारी ड्युटीवर असताना कोणालाही न सांगता गेला आहे. मांडूळ विक्री करण्यासाठी गेल्यानंतर वनविभागाने केलेल्या कारवाईत पकडले असल्याचे सांगण्यात आले.

सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके आणि पोलीस कर्मचारी दीपक धाबेकर अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण येथील येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक निरीक्षक विश्वास चव्हाण हे पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास होते. ते चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात नेमणूक होती. त्यांना पाषाण पोलीस चौकी देण्यात आली होती. तर कर्मचारी दीपक धाबेकर हे देखील याच चौकीत नेमणुकीस होते.

दरम्यान गेल्या वर्षी एपीआय चव्हाण  यांची मुंबईत बदली झाली. दरम्यान कर्मचारी धाबेकर आणि चव्हाणके यांना बुधवारी दुपारी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मांडूळ विक्री प्रकरणात पकडले. त्यावेळी दोघे पोलीस असल्याचे समोर आले. त्याची माहिती चतुःश्रुगी पोलिसांना मिळाली. त्यावेळी चतुःश्रुगी पोलीस खडबडून जागे झाले आणि कर्मचारी धाबेकर यांची पाषाण चौकीत चौकशी सुरू केली. त्यावेळी ते नसल्याचे दिसून आले. यानंतर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. काही तांस नेमकं प्रकरण काय आणि पकडले कसे हेच समजले नाही. रात्री उशिरा मांडूळ प्रकरणात दोघांना पकडण्यात आले आहे. वनविभागाने कारवाईकरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे समजले.

याबाबत चतुःश्रुगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांना विचारले असता त्यांनी कर्मचाऱ्यास पकडण्यात आले आहे, इतकी माहिती मिळाली आहे. दुपारपर्यंत संपूर्ण माहिती येईल असे सांगितले.