तिरंग्याचा अवमान करणाऱ्या पाकिस्तानी, खलिस्तानी समर्थकांंवर भारताची ‘ही’ पत्रकार ‘वाघीण’ पडली ‘भारी’ (व्हिडीओ)

लंडन : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानचे जगभरात राहणारे नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करत आहेत. अशीच घटना लंडनमधील भारतीय उच्चायोगबाहेर घडली. यावेळी पाकिस्तानी आणि खालिस्तानी समर्थकांविरोधात भारतीय महिला पत्रकार एकटी भिडली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूनम जोशी असे या महिला पत्रकाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील भारतीय उच्चायोगबाहेर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरु होता. ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर काही वेळाने पाकिस्तानी आणि खालिस्तानी समर्थक येथे पोहचले आणि त्यांनी भारताविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी भारताच्या तिरंग्याचा अपमान केला. त्यावेळी पूनम जोशी या भारतीय महिला पत्रकाराने यास कडाडून विरोध केला. त्या एकट्याच या सर्वांविरोधात भिडल्या आणि तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांच्या हातून झेंडा हिसकावून घेतला. पूनम जोशी स्वातंत्र्य दिनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेल्या होत्या.

पाकिस्तान्यांशी भिडल्या शाझिया इल्मी
शाझिया इल्मी या काही आरएसएस नेत्यांसह सेऊलमध्ये भारतीय दुतावासात गेल्या होत्या. त्यावेळी थोड्या अंतरावर पाकिस्तानी समर्थकांचा जमाव भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी आम्ही भारतातून आल्याचे सांगत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे बोलणे एकून न घेता त्या जमावाने पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. जमावाने देशविरोधी आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे चिडलेल्या इल्मी यांनी जमावासमोर ‘भारत जिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत सणसणीत प्रत्युत्तर दिलं. इल्मी आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये होत असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने स्थानिक पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like