Coronavirus : तबलिगी जमातीमध्ये सामिल झालेल्या ‘कोरोना’ग्रस्तानं विमानानं केला होता प्रवास, 31 प्रवाशांना पाठवली नोटीस

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मणिपूर सरकारने 11 मार्चला दिल्लीवरुन इंफाळला विमानाने आपलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी तात्काळ कंट्रोल रुमला रिपोर्ट करण्यास सांगितले आहे, सांगण्यात येत आहे की विमानात दिल्लीहून एक कोरोनाबाधित रुग्ण देखील आला होता.
अधिकृत माहितीनुसार 31 प्रवासी ज्यात 14 महिला देखील होत्या, या सर्वांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचा धोका आहे कारण हे सर्व 65 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

करोनामुळे संक्रमित हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातीत सहभागी झाला होता जो 11 मार्चला दिल्लीला पोहोचला. संक्रमित व्यक्तीच्या कुटूंबातील 31 सदस्यांना क्वॉरेंटाइन करण्यात आले आहे. तबलिगी जमातीत सहभागी झालेल्या लोकांचा देशभरात शोध सुरु आहे.

अधिकाऱ्यांना या कोरोनाग्रस्त व्यक्तीची माहिती मिळआल्यानंतर त्या व्यक्तीला इंफाळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अधिकाऱ्यांनी सांगितले की थाउबल जिल्ह्यात लिलोंग क्षेत्रातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीवर आता येथील आयुर्विज्ञान संस्थानमध्ये उपचार सुरु आहेत.

या दरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लिलोंग बंद केले होते. लोक आणि वाहन येण्या – जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. उपायुक्त एन बंदना देवी यांनी गुरुवारी आदेशात सांगितले की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमा देखील सील करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण 24 मार्चला आढळला होता, जेव्हा ब्रिटनहून एक 23 वर्षीय कोरोना बाधित महिला परत राज्यात आली होती.

केंद्र सरकारने दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिगी जमातीत सहभागी 960 विदेशी लोकांची ब्लॅकलिस्ट आणि जमात संबंधित कार्यक्रमात सहभागी असलेल्याचा पर्यटन वीजा देखील रद्द केला आहे. यापूर्वी गृहमंत्रालयाने आज माहिती देत कोरोना व्हायरसचे संक्रमण पाहता देशभरातील तबलिगी जमातीचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 9000 लोकांना वेगळे ठेवण्यात आले आहे.