INS चेन्नई मधून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अरबी समुद्रात लक्ष्यावर लावला योग्य निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाने ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी स्वदेशी स्टील्थ विध्वंसक आयएनएस चेन्नई (INS Chennai) कडून घेण्यात आली. यावेळी क्षेपणास्त्राने पिनपॉईंट अचूकतेने अरबी समुद्रात आपल्या लक्ष्याला यशस्वीरित्या ठोकले. ब्रह्मोसच्या माध्यमातून युद्धनौकाद्वारे भारतीय नौदलाला लांब पल्ल्याच्या पृष्ठभागांची लक्ष्ये भेदण्यात यश आले आहे.

या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 पट वेगवान लक्ष्य गाठण्याची क्षमता आहे. यापूर्वी डीआरडीओ आणि रशियन शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेली ग्राउंड-टू-सर्फेस क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र 8.4 मीटर लांब आणि 0.6 मीटर रुंदीचे आहे. त्याचे वजन 3000 किलो आहे. या क्षेपणास्त्रामध्ये 300 किलो वजन आणि 300 ते 500 कि.मी.पर्यंत स्फोटके ठेवण्याची क्षमता आहे.

ब्रह्मोस जमीन, हवा, पाणी आणि मोबाइल लाँचरमधून डागले जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे दोन-चरणांचे वाहन असून त्यामध्ये सॉलिड प्रोपेलेट बूस्टर आणि लिक्विड प्रोपेलेट रेमजेम सिस्टम आहे. ब्रह्मोसची पहिली परीक्षा 12 जून 2001 रोजी आयटीआर चांदीपुर येथून घेण्यात आली. बरेच दिवस भारत नवीन प्रकारच्या क्षेपणास्त्रांसह जुन्या क्षेपणास्त्रांच्या प्रायोगिक चाचण्या करीत आहे.