COVID-19 : ‘कोरोना’ व्हायरसनं अधिक संक्रमित ‘हे’ 15 राज्य, सर्वात अधिक रिकव्हरी रेट असलेल्या ‘या’ 15 राज्यांबद्दल जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आरोग्य मंत्रालयानुसार कोरोना व्हायरसच्या एकुण प्रकरणात प्रमुख 15 राज्य महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडु, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, एमपी, हरियाणा, तेलंगना, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, आसाम आणि ओडिसा आहेत.

मंत्रालयानुसार, रिकव्हरी रेटच्या प्रकरणात प्रमुख 15 राज्य चंडीगढ, मेघालय, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगढ, त्रिपुरा, बिहार, मिजोरम, एमपी, झारखंड, ओडिसा, गुजरात, हरियाणा, लडाख आणि उत्तर प्रदेश आहे. देशातील अनेक अशी राज्य आहेत, जेथे कोरोना व्हायरसचा प्रभाव जास्त नाही, ज्यामध्ये पूर्वोत्तरच्या राज्यांचा सहभाग आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाच्या एकुण केस 6,04,641 झाल्या आहेत. यापैकी 2,26,947 सक्रिय केस आहेत, तर 3,59,860 लोक संक्रमण मुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकुण 17,834 मृत्यू झाले आहेत. मागील 24 तासात भारतात कोरोनाची 19,148 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 434 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच भारतात कोरोना रूग्णांचा आकडा 6 लाखांच्या पुढे गेला आहे. देशात रिकव्हरी रेट जवळपास 60 टक्के आहे.