राष्ट्रीय महामार्ग क्रं.3 वर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रं.3 वर राञी विचिञ घटनाघडली. पाण्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या हा नदी पाञा जवळुन दभाशी पुला जवळील रस्त्यावर आला. व रस्ता ओलाडुन जाण्याचा प्रयत्न करतेवेळी महामार्गावरुन भरधाव वेगाने बिबट्याला धडक दिली यातच बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जागीच ठार झाला. सकाळी हि बाब नागरीकांच्या लक्षात आल्यावर वन विभाग अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पहाणी करुन बिबट्याचे पोस्टमार्टम केल्यावर पुढील माहिती कळले असे सांगण्यात आले.

जंगल भागात कृञिम पाणतळे तयार केले. त्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी कृञिम पाणतळे आहे. त्यात पाणीच नाही अशी स्थिती असल्याने पाण्याच्या शोधात वन्य जिव भटकंती करत रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत ठार होतात. अशा अनेक घटना घडुन वन विभाग लक्ष देत नाही. वन विभागाचे वन्य जीवांकडे दुर्लक्ष होत आहे. हे ह्या बाबीवरुन लक्षात येत. अगोदर हि लळिंग घाटात सुध्दा व साक्री पट्टयात वाहन धडकेत बिबट्या ठार झाले आहे. पाण्याच्या शोधातच बिबट्या ठार झाल्याची चर्चा दभाशी गावातील ग्रामस्थ करत आहे. सातपुडा रांगामुळे वन विभाग पट्टा भाग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु वन विभागाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. जंगल तोड हि होते. ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहे. वन विभाग झोपेचे सोंग घेत असा आरोप ग्रामस्थ करत आहे.

Visit : Policenama.com