Lockdown मध्ये 11 वर्षीय मुलाला त्याचे हरवलेले ‘पोपट’ सापडले, महिलेनं केलं होतं ‘बंदी’, जाणून घ्या ‘रोचक’ कथा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – शुक्रवारी राजसमंद जिल्ह्यातील कुंवरिया गावात पोलिसांची अनोखी तक्रार आणि एक अनोखा निर्णय पहायला मिळाला. फिर्यादी हा अकरा वर्षाचा मुलगा होता. त्याच्या दोन पाळीव पोपटांना एका महिलेने पळवून नेल्याच्या तक्रार त्याने केली होती. ती मुलाला त्याचे पोपट परत देत नव्हती. मुलाच्या तक्रारीवरून पोलिस महिलेच्या घरी चौकशीसाठी पोहोचले असता, दोन्ही पोपट हे तिचे असल्याचे सांगितले. मग पोलिसांनी तपास केला आणि थोड्याच वेळात त्या महिलेचा खोटारडापणा पकडला गेला. पोलिसांनी थोडक्यात चौकशी केल्यानंतर मुलाला दोन हरवलेला पाळीव पोपट पुन्हा मिळाले.

जागरण प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, 11 वर्षीय मुलगा करणसिंग राजस्थानच्या कुंवरिया पोलिस ठाण्यात आला आणि त्याने पोलिस अधिकारी पेशावर खान यांच्याकडे तक्रार केली की, एक महिला त्याचे पाळीव पोपट परत करत नाही. मुलाने सांगितले की, त्याने दोन पोपट पाळले होते. त्यांचे नाव कृष्णा आणि राधा असे होते. लॉकडाऊन दरम्यान त्याचे पोपट पळून गेले आणि तो त्यांना शोधू शकला नाही. लॉकडाऊनमध्ये थोडी सूट मिळाली तेव्हा त्याने पोपट शोधण्यास सुरुवात केली. त्याचे दोन्ही पोपट त्याच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या घरात होते, तेथील एका महिलेने त्यांना पिंजऱ्यात कैद केले होते.

मुलाने वारंवार विनंती करूनही महिलेने मुलाला पोपट देण्यास नकार दिला. मुलाच्या निष्पाप आवाज ऐकून अधिकाऱ्याने हेड कॉन्स्टेबल हरीसिंग आणि रोशन लाल यांना मुलासह महिलेच्या घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्या महिलेने पोलिसांना पोपट देण्यासही नकार दिला आणि सांगितले की, हा पोपट माझा आहे.

मुलाने सांगितले की, दोन्ही पोपट त्याला ओळखतात. जर त्याने त्याच्या नावाने हाक मारली तर दोघेही त्याच्याकडे येतील. यावर पोलिसांच्या सल्ल्यावर महिलेने आज्ञा पाळली आणि पोपटाला कैदेतून मुक्त केले. मुलाने पोपटांना नावाने हाक मारताच दोन्ही पोपट त्याच्या खांद्यावर बसले. अशा प्रकारे पोलिसांनी पोपटाला मुलाच्या स्वाधिन केले आणि तो आनंदाने आपल्या घरी परतला. इकडे, ठाणेदारी पेशावर खान यांचे म्हणणे आहे की, आम्हालाही या निर्णयामुळे आनंद झाला आहे.