सरकारी बंगल्यात आणखी काही दिवस राहण्याची प्रियंका यांनी केली विनंती, PM मोदींनी दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या राजकीय नेत्याप्रमाणे मन मोठे करत प्रियंका गांधी वाड्रा यांना 35 लोधी इस्टेट वाल्या सरकारी बंगल्यात आणखी काही दिवस राहण्याची परवानगी दिली आहे. सरकारवर टिका केल्याने प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले, असा आरोप होत असताना, पीएमने त्यांच्या विनंतीला मान देत परवानगी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारने प्रियंका यांना नोटीस जारी करून 35 लोधी इस्टेट बंगला 1 ऑगस्टपूर्वी रिकामा करण्यास सांगितले होते. एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याने नियमाप्रमाणे प्रियंका या बंगल्यात राहू शकत नाहीत. चर्चा अशीही होत आहे की, प्रियंका आपला बंगला रिकामा करून लखनऊमध्ये राहण्यासाठी जात आहेत. यादरम्यान प्रियंका यांच्याकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली की, आणखी काही दिवस या बंगल्यात राहण्याची परवानगी मिळावी.

हे प्रकरण जेव्हा पीएमकडे गेले तेव्हा त्यांनी प्रियंका यांची मागणी मान्य करून आणखी काही दिवस राहण्याची परवानगी दिली. मोदी समर्थकांनी म्हटले आहे की, यापूर्वी देखील मोदी यांनी गांधी कुटुंबाबत मोठे मन दाखवले आहे. तर गांधी कुटुंब त्यांच्यावर नेहमीच टिकेची झोड उठवत असते.

भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठी कटुता आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रियंका गांधी यांना परवानगी देऊन पीएम मोदी यांनी मोठे मन दर्शवले आहे. मोदी यांनी 2011मध्ये सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या होत्या, जेव्हा आरोग्य समस्येमुळे त्या परदेशात निघाल्या होत्या. 2013 मध्ये जेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या आणि प्रकृती खराब झाली तेव्हा त्यांना संसद भवनातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा मोदी यांनी ट्विट करत म्हटले होते की, हे समजल्यावर खुप आनंद झाला की, सोनिया गांधी आता ठिक झाल्या आहेत.