रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ‘कोरोना’ संक्रमित, झाले क्वारंटाइन, सुरू ठेवणार ‘कामकाज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास हे कोरोनाने संक्रमित आढळले आहेत. त्यांचा कोविड-19 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते आयसोलेशनमध्ये राहून आपले काम सुरू ठेवणार आहेत. यापूर्वी अनेक राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ट्विट करत म्हटले की, माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. असिम्टोमेटिक कोरोना असल्याचे निदान झाले आहे. सध्या मी ठीक आहे. मी त्या लोकांना सावध करू इच्छितो, जे नुकतेच माझ्या संपर्कात आले होते. मी आयसोलेशनमध्ये राहून कामकाज सांभाळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कामकाज सामान्य राहणार आहे. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलीफोनद्वारे सर्व महत्वाच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात राहणार आहे.