RSS चा सल्ला, योग आणि काढा पळवून लावेल कोरोना, अ‍ॅपद्वारे दिली माहिती

बिलासपुर : वृत्त संस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शाखा अ‍ॅपद्वारे स्वयंसेवकांसह देशवासीयांना सूर्य नमस्कार, भस्त्रिका, प्राणायाम, अनुलोम-विलोम व भ्रामरी यांचा आपल्या दिनचर्येत समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. हे योग व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे कोरोनासह सर्व प्रकारच्या रोगांशी लढण्यासाठी मदत मिळते. सोबतच काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला देत तो बनवण्याची कृती सुद्धा सांगण्यात आली आहे.

अ‍ॅपमध्ये संघाने सांगितले आहे की, अस्थमा, डायबिटीज आणि हृदयरोगी कोरोनाच्या संसर्गाने गंभीर प्रकारे ग्रस्त होत आहेत. अफवांपासून सावध करत सांगण्यात आले आहे की, असा कोणताही पुरावा नाही की नियमितपणे सलायनने नाक धुण्याने कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होतो. उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या भागात संसर्ग पसरतो.

अल्ट्राव्हायलेटचा उपयोग किटाणुमुक्त बनवण्यासाठी नाही केला पाहिजे. यामुळे त्वचेत जळजळ निर्माण होते. मच्छर चावल्याने कोरोना पसरत नाही. थर्मल स्कॅनर अशा लोकांना ओळखू शकतो, ज्यांना ताप आहे. कोरोनाने संक्रमित लोकांना ओळखू शकत नाही. अँटीबायोटिक्स संसर्गाविरूद्ध काम करत नाहीत. अँटीबायोटिक्स केवळ बॅक्टेरियाद्वारे झालेला संसर्ग दूर करू शकते.

दिवसात तीन वेळा काढा प्या
संघाने दिवसात तीन वेळा काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार बारीक कुटलेल्या पाच ते 10 बारीक लिंब आणि गुळवेलीचे देठ, पाच ते 10 तुळशीची पाने, दोन ते पाच काळीमिरी, 1/4 ते 1/2 चमचे हळद आणि आले घ्या. हे सर्व 100 ग्रॅम पाण्यात उकळवा. पाणी एक चतुर्थांश झाल्यानंतर काढा तयार होईल.

अ‍ॅपमध्ये सॅनिटायजर बनवण्याची पद्धत सुद्धा सांगण्यात आली आहे. यानुसार, एक लीटर पाण्यात 100 ग्रॅम लिंबाची पाने आणि आणि 20 ते 25 ग्रॅम तुळशीची पाने उकळवा. जेव्हा पाणी 600 मिलीलीटर होईल तेव्हा त्यामध्ये पाच ते 10 ग्रॅम कापूर आणि तुरटी टाका. हे सॅनिटायझर हातांच्या स्वच्छतेसाठी अत्यंत उपयोगी आहे.