डायबेटिज आणि ब्लड प्रेशरचा रुग्ण असाल तर ही बातमी नक्की वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डायबेटिज आणि ब्लड प्रेशर यांसारखे रोग जीवाणू आणि व्हायरसद्वारे पसरत नाहीत तरीही लोक आजारी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे धकाधकीची जीवनशैली. तणावविरहित जीवनशैलीमध्ये योग्य खाण्याच्या सवयी, व्यायाम, पुरेसे झोप आणि सकारात्मक विचार यांचा अंतर्भाव होतो. हवामानानुसार, जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानानुसार, जर जीवनशैली अंगिकारली तर निरोगी आणि आनंदी जीवन व्यतीत करता येईल.

इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अहवालानुसार, २०१७ साली देशातील १०० जिल्ह्यातील जवळपास २२. ५ दशलक्ष रुग्णांना हाय ब्लडप्रेशरची समस्या होती. थोडक्यात देशातील प्रत्येक आठवा व्यक्ती या समस्येने पीडित आहे. भारतीय लोकसंख्येच्या जवळपास ८.६ % लोक हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने पीडित आहेत. यामध्ये १० % पुरुष आणि ६. ७ % महिला आहेत. भारतात डायबेटिजचे ६२ दशलक्ष रुग्ण आहेत. एवढेच नाही तर दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू या आजारामुळे होतो.

डायबेटिज असणाऱ्यांनी उन्हाळ्यात ‘ही’ काळजी घ्या
डायबेटिज असलेल्या व्यक्तींना उन्हाळ्यात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजची मात्रा वाढते. ज्यामुळे डायबेटिज समस्या निर्माण होते. त्यामुळे डायबेटिजच्या रुग्णांनी दिवसातून कमीतकमी तीन लिटर पाणी पिले पाहिजे. ग्लूकोमीटरद्वारे नियमितपणे ग्लुकोजची मात्रा तपासली पाहिजे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, वेळोवेळी औषधे बदलली पाहिजेत.

साधारपणे असे निदर्शनास आले आहे की, डायबेटिज असलेले लोक रक्तातील साखर नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्तात ग्लुकोजची पातळी वाढते याच मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यामुळे सरबत, लस्सी आणि थंडपेयांचं सेवन अधिक प्रमाणात होते. आइस्क्रीम, कुल्फीद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. डायबेटिज रुग्णांनी सफरचंद, योग्य प्रमाणात टरबूज आणि कलिंगड या फळांचे सेवन केले पाहिजे.

हाय ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात
उन्हाळ्याच्या हंगामात, हिवाळ्याच्या तुलनेत ब्लड प्रेशर जवळपास १० मिमी कमी होते. कारण हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि उन्हाळ्यामध्ये प्रसरण पावतात. उन्हाळ्यात तापमान वाढलं की रक्तवाहिन्या पर्सन पावतात आणि धमन्यांमधील ब्लड प्रेशर कमी होतो. ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची मात्रा कमी केली पाहिजे.