श्रीलंकेनंतर भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्लामिक स्टेट (इसिस) शी संलग्न असलेल्या अल मुरसलत या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेसारखेच भारत आणि बांगला देशातही दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इसिस ने अशा धमकीचे पोस्टर्स प्रसिद्धीला दिले आहे. बंगाल आणि हिंदमध्ये खलिफाचा लढा उभारणाऱ्याचा आवाज कधीही बंद होऊ शकत नाही.  आमच्या बदल्याची आग कधीही शांत होणार नाही, असा इशारा इसिसच्या दहशतवाद्यांनी सांगितले आहे.

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले की, इसिसने अबू मोहम्मद अल बंगालीला बंगाला देशातील आपला म्होसक्या नियुक्त केला आहे. बंगालीला दहशतवादी हल्ल्याची योजना बनवणे आणि दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  बांगला देशाची राजधानी ढाकातल्या गुलिस्ताँ थिएटरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणल्यानंतर इसिसने धमकीचे हे पोस्टर जारी केले आहे.

जेव्हा इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात सिरीयात इसिसने पराभव स्वीकारला आहे. आणि मुस्लिमांना भडकावू भाषण दिली आहे. अशावेळी इसिसने ही धमकी दिली असल्याने गुप्तचर यंत्रणा इसिसच्या होणाऱ्या छोट्या छोट्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.