Coronavirus Impact : ‘कोराना’मुळं तिहार जेलमध्ये बनवले ‘आयसोलेशन’ वार्ड, सर्व कैद्यांची होणार तपासणी

नई दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसहित १०० हुन अधिक देशात पसरलेल्या कोरोनाने आता भारतात आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. कारागृहातही याबबाबत काळजी घेण्यात येत आहे. कोरोना टाळण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने आठही कारागृहात एक आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे.

कोणत्याही कैद्यामध्ये जर कोरोनाचे लक्षणे आढळली तर त्या कैद्याला आयसोलेशन विभागात ठेवण्यात येणार आहे. तिहार जेल प्रशासनाने जवळपास सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे, आतापर्यंत कोणत्याही कैद्यांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. तिहार जेल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या कारागृहात सुमारे 17500 कैदी आहेत.

याशिवाय तिहार कारागृहात येणाऱ्या नवीन कैद्यांना पहिले ३ दिवस स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर तुरूंगात हलविण्यात आले आहे. कोरोना टाळण्यासाठी तिहार जेल प्रशासन सोमवारपासून आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. वास्तविक, आतापर्यंत कोणताही कैदी आठवड्यातून दोनदा त्याच्या कुटूंबाला भेटू शकत होता, परंतु कोरोना विषाणूमुळे सोमवारपासून कैदीचे कुटुंब आठवड्यातून एकदाच त्याला भेटू शकेल.