#VIDEO : डासांना पळवून लावण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ; एकदा करून पहाच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संध्याकाळी ५ ची वेळ झाली की घरात डासांशी युद्ध सुरु होते. अनेक मोठमोठे आजार या डासांमुळे जडतात. मग डासांना पाळवणारे स्प्रे, कॉइल, इलेकट्रीक मॉस्क्युटो रिपेलंट चा वापर केला जातो मात्र या सगळया केमिकल युक्त गोष्टींचा माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. नकळतपणे श्वासामार्फत शरीरात जाणारा मच्छर अगरबत्तीचा केमिकलयुक्त धूर किंवा लिक्विड शरीराला कालांतराने मोठी हानी पोहचवत असते. त्यामुळे डास घालवण्यासाठी अशा केमिकलयुक्त पर्यांयापेक्षा घरगुती आणि सुरक्षित उपायांचा वापर फायदेशीर ठरतो. या घरगुती उपायांमुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नसून डासांची समस्या घालवण्याठी मदत होते.

१) ‘कापूर’, सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय
डास घालवण्यासाठीचा सर्वांत सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे कापूर. कापराच्या काही वड्या जाळा. कापूर जाळल्यानतंर घराची खिडक्या, दारे १० मिनिटांसाठी बंद करुन घ्या. यामुळे डास पळून जातील. तसंच कापूर आणि लवंग एका सुती कपड्यात बांधून घरातील एखाद्या कोपऱ्यात बांधून ठेवा त्यामुळेही डास पळून जातात.

२) लसूण
लसूनही डास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसणाचा रस शरीरावर लावल्याने किंवा शिंपडल्यानेही डासांची समस्या कमी होते.

३) राई तेल
राईच्या तेलात ओव्याची पावडर मिसळून त्याचे तुकडे तयार करा. हे तुकडे घरातील सर्व कोपऱ्यांमधून एखाद्या उंच जागेवर ठेवा. हा उपाय केल्याने डास नाहीसे होतात.

४) कडुनिंब
कडुनिंबाच्या पानांचाही डासांपासून बचाव करण्यासाठी फायदा होतो. कडुनिंब आणि नारळाचं तेल समान प्रमाणात एकत्र करुन ते मिश्रण शरीरावर लावल्याने डास जवळ येत नाहीत. याचा परिणाम सलग ८ तासांपर्यंत राहतो.

5) लवेंडर
डास घालवण्यासाठी लवेंडर फुलाचा चांगला फायदा होतो. लवेंडर फुलाचा सुगंध डास पळवून लावतो. संपूर्ण घरात लवेंडर फुलाचं तेल शिंपडल्यास डास जाण्यास मदत होते.