Navi Mumbai | धक्कादायक ! महिला पोलिसानं चक्क पोलिस नाईकाची ‘या’ पध्दतीनं केली ‘गेम’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navi Mumbai | मुंबईमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिस शिपाईने अंतर्गत वादाचा सुड एका पोलिस नाईकवर उगारला आहे. अपघाताचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने सुपारी देत सहकारी पोलिस नाईकची हत्या (Murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel City Police) महिला पोलिस कर्मचार्‍यासह दोघांना अटक (Arrested) केली आहे. या घटनेवरुन मुंबई पोलिस (Navi Mumbai) दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई पोलिस दलात पोलिस नाईक असलेल्या शिवाजी सानप (Shivaji Sanap) व महिला पोलीस शिपाई शितल पानसरे (Shital Pansare) दोघांनी मुंबई नेहरू नगर पोलिस ठाण्यात एकत्र नोकरी केली आहे. दोघांची दृढ मैत्री होती. मात्र, याच मैत्रीने सानपचा घात केला. 2019 मध्ये महिला पोलिस शिपाई पानसरे हिने CBD आणि विष्णू नगर पोलिस ठाण्यात (Vishnu Nagar Police Station) सानप विरोधात बलात्कार 376, विनयभंग 354 आणि इतर कलमान्वये तक्रार देऊन गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दोघात वाद झाला. यावरुन सानपचा बदला घेण्यासाठी 3 वर्षांपासून कट रचला. 15 ऑगस्ट रोजी सानपचा अपघातात मृत्यू झाला. पण, हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

सानप पनवेल रेल्वे स्थानकात उतरून पनवेल बस डेपोकडे जाताना संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत 2 आरोपींनी शिवाजी सानप (Shivaji Sanap) यांना मागून धडक देत गंभीर जखमी केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका नॅनो गाडीने मागून येऊन शिवाजी सानप यांना उडवले. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच 3 दिवसानंतर शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला. वापरलेल्या नॅनो गाडीला (Nano car) नंबर प्लेट नव्हती. घटनेनंतर आरोपींनी तरघर येथील ओसा़ड स्थळी पुरावा नष्ट करण्यासाठी नॅनो जाळली होती. यामुळे सर्व मार्गाने शाध घेतला तरी गाडी आढळली नाही.

दरम्यान, तपासात अनेक नॅनो गाड्यांच्या मालकांची चौकशी करण्यात आली, मात्र ठोस काही हाती लागत नव्हते. पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे मुंबईतून फिरवली. शिवाजी सानप यांनी प्रवास केलेल्या कुर्ला ते पनवेल रेल्वे स्थानकातील सर्व CCTV तपासले. यामध्ये 2 संशयित इसम शिवाजी सानप यांचा पाठलाग करत असल्याचे समोर आले. CCTV वरून 2 आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले गेले असता सत्य प्रकार समोर आला. या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे (Shital Pansare) यांचा हात असल्याचे उघड झाले. या दरम्यान, उलवे येथे राहणाऱ्या सोसायटी मधील वॉचमन विशाल जाधव (Vishal Jadhav) आणि गणेश चव्हाण (Ganesh Chavan) यांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी आरोपी शितल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तिघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शितल पानसरेने हत्येचा कट कसा रचला?

आरोपी महिला पोलिस शिपाई शितल पानसरेने 3 वर्षापूर्वीच शिवाजी सानप यांच्या हत्येचा कट रचला होता.
पहिले लग्न होऊनही तीने परत एकदा सोशल मीडियाचा वापर करून धनराज जाधव यांच्याशी दुसरे लग्न केले.
अपघात करून हत्या केल्यास संशय येणार नाही,
असा विचार शितलने करून ठेवला होता.
यासाठी बस चालकाच्या शोधात शीतल होती.
यासाठी तिने एसटी महामंडळात काम करणाऱ्या धनराज जाधव याला इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवत गळाला लावला.
अवघ्या 5 दिवसाच्या इंन्स्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात करून 5 व्या दिवशी नाशिक येथे शितल पानसरेने धनराज जाधव यांच्याशी विवाह केला.
लग्नानंतर शिवाजी सानप या पोलिसाची हत्या करण्यासाठी शितलने धनराज जाधव यांच्याकडे तगादा लावला.

दरम्यान, याकडे दुर्लक्ष करत आपण हे काम करणार नाही,
असे सांगितल्यानंतर शितल पानसरे हिने धनराज जाधव यांच्या विरोधात विविध कलमांखाली पोलिस तक्रार केली.
याला घाबरून धनराज जाधव यांनी ST महामंडळाची नोकरी सोडून चेन्नई (Chennai) येथे पळ काढला होता.
या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी धनराज जाधव (Dhanraj Jadhav) यांना बोलवून त्यांच्याकडे विचारपूस केली
असता त्यांनी शितल पानसरेबाबत सर्व जवाब पनवेल शहर पोलिसांकडे (Panvel City Police) नोंदवला आहे.

Web Titel :- Navi Mumbai | Shocking ! Women Police do wrong things with police man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे