नवाजुद्दीन सिद्धीकीच्या ‘सेक्रेड गेम २’चे पोस्टर रिलीज

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्रेड गेम २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच ‘सेक्रेड गेम २’चे पोस्टर रिलीज झाले आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीसोबत कल्की कोचलीन, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी हे ‘सेक्रेड गेम २’ घेऊन येत आहे.

याआधीच्या टिझरमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कल्की कोचलीन, रणवीर शौरी आणि पंकज त्रिपाठी दिसून आले होते. या टिझरसोबत कॅप्शनदेखील लिहले होते की, ‘खेळाचा बाप कोण आहे ?’ त्याचबरोबर नुकत्यात प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी गणेश गायतोंडेची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच फोटोमध्ये कॅप्शनदेखील लिहले आहे की, ‘पिछली बार क्या बोला था गणेश भाई को? औकात!

या वेबसिरीजमध्ये सैफ अली खानने सरताज सिंग यांची भूमिका व कल्की कोटलीनने बात्यो अबन्मनची भूमिका साकारत आहे. ‘सेक्रेड गेम्स-२’ च्या शुटिंगसाठी अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पूर्ण टिमने केनिया (नैरोबी) मध्ये शुटिंग सुरु केले होते.