Nazare Dam | नाझरे धरण कोरडे पडल्याने पुरंदर, बारामतीत दुष्काळाची तीव्रता वाढली

बारामती : Nazare Dam | पाऊस कमी झाल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना तसेच काही भागात लोकांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. अशातच बारामती आणि पुरंदर भागासाठी महत्वपूर्ण असलेले नाझरे धरण कोरडे पडल्याने ५६ गावांवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या धरणावर पुरंदर तालुक्यातील ४० गावे तर बारामती तालुक्यातील १६ अशी एकूण ५६ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एमआयडीसी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो.

धरणात पाणीसाठा होवू शकला नाही

पुरंदर तालुक्यात कमी पाऊसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही. नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे. तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. (Nazare Dam)

राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती

मराठवाड्यात महत्वाची ४० धरणे आहेत मात्र यात फक्त १६ टक्के पाणीसाठा आहे.
संभाजीनगरला ८१ लघुप्रकल्प आहेत त्याठिकाणी फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पुण्यात ५० प्रकल्प आहेत यात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे
तर जायकवाडी धरणात ५. टक्के जलसाठा शिल्लक आहे.
देशभरातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत मात्र पाण्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…