राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का ! मालेगाव महापालिकेतील २० नगरसेवकांची पक्षाला ‘सोडचिठ्ठी’

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील आमदार सोडचिठ्ठी देत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. राज्यातील चार महत्वाच्या आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता नाशिकमधील मालेगाव महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला आहे. याचबरोबर माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

या आमदारांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकण्याचे कारण देखील सांगितले आहे. तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा एकदेखील खासदार सभागृहात हजर नव्हता. त्यांनी या विधेयकाला विरोध न केल्याने आपण पक्षाला रामराम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवला होता. त्यातील सर्व नगरसेवकांनी आज पक्षाला रामराम केल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आता हे नगरसेवक आणि माजी आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –