NCP Chief Sharad Pawar | ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण…’ – शरद पवार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | येणार्‍या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढावे, अशी माझी इच्छा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये (Aurangabad News) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार हे सध्या औरंगाबाद दौर्‍यावर आहेत. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे आपण म्हणालो नव्हतो असे स्पष्टीकरण सुद्धा पवार यांनी यावेळी दिले.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या (Shivsena MLA) मुद्द्यांवर पवार म्हणाले की, काही तरी कारण द्याव, म्हणून ते देत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचे तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कारण दिले. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नाही.

 

महाविकास आघाडीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पण, आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी इच्छा आहे.
मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, याबाबत आमच्या तीन पक्षांची चर्चा झालेली नाही. (NCP Chief Sharad Pawar)

 

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की,
पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो.
त्यानुसार, पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या.
परंतु, मी मध्यावधी निवडणूक होईल असे म्हणालो नव्हतो.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar upcoming elections should be fought together by mahavikas aghadi but sharad pawars suggestive statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा