NCP Chief Sharad Pawar | मी कृषीमंत्री असताना कांद्यावर निर्यात कर लावला नव्हता, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी कृषीमंत्री (Agriculture Minister) असताना कांद्यावर कधीही 40 टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) लावलं नव्हतं, असा पलटवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने (Central Government) परत घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) केंद्रात कृषीमंत्री असताना कांद्याला इतका भाव नव्हता, मोदी सरकारने कांद्याला भाव दिला असे मुख्यमंत्री शिंदे म्हटले होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवार साहेब (NCP Chief Sharad Pawar) मोठे नेते आहेत. तेही दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कांद्याला भाव देण्याचा निर्णय त्या संकटकाळात घेण्यात आला नव्हता. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यामुळे याचं राजकारण करण्यात येऊ नये. केंद्र सरकारने केलेल्या कामाचं राजकारण न करता स्वागत केलं पाहिजे.

कांद्याला 4 हजार रुपये भाव द्यावा – शरद पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारनं कांद्याला प्रति क्विंटलला 2410 रुपयांचा दिलेला भाव कमी आहे. त्याऐवजी प्रति क्विंटल चार हजार रुपयांचा भाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 2400 रुपयांमध्ये निघणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी करावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, मा. एकनाथ शिंदे साहेब, ‘पवार साहेब कृषीमंत्री असताना असा निर्णय झाला नाही’, असं आपण म्हणालात, पण अजितदादांसोबत पत्रकार परिषदेत आपण हे वक्तव्य करण्याआधी पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले होते, याची माहिती मा. अजितदादांकडून घ्यायला हवी होती. ती घेतली असती तर कदाचित आपण हे वक्तव्य केलंच नसतं.

आदरणीय पवार साहेब यांनी असा निर्णय घेतला नाही, हे आपलं म्हणणं नक्कीच खरं आहे.
कारण पवार साहेबांनी आजच्या भाजपा (BJP) सरकार प्रमाणे निर्यातशुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले नाहीत.
प्रसंगी साहेब तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांशी भांडले आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेतले.
त्यामुळं शिंदे साहेब आपण उगाचंच राजकीय पतंगबाजी न केलेचीच बरी!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न