NCP Chief Sharad Pawar | निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार स्पष्ट बोलले, म्हणाले- ‘ निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने (Election Commission) मागील आठवड्यात शिंदे गटाला शिवसेना नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) दिले. निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि खूण हिसकावून घेणं असं कधीच झालेलं नाही. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेत यात शंका असल्याचे, शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, मीही काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलो होतो, मात्र मी असं काही केलं नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं. मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथे वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की पक्षाचे नाव आणि खूण देऊन टाकलं. देशाच्या इतिहासा असं कधीच घडलं नाही. अशावेळी जनता ही ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत बघायला मिळतील असे शरद पवार यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका
यावेळी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.
निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलत आहे
असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच्यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar pc taking away the party and symbol by misusing power has never happened sharad pawars first reaction on election commission decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या