राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरीतील उमेदवार बदलला, माजी आमदारास दिली उमेदवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार बदलला आहे. यापुर्वी सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी बंडखोरी केली होती. तडजोडीअंती राष्ट्रवादीनं अधिकृत उमेदवार म्हणून आता अण्णा बनसोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार असून त्यांचा पिंपरी आणि परिसरात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघात आता अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या कोटयातील सर्वच उमेदवारांची घोषणा केली आहे. काही तासात आणखी काही जणांची नावे जाहीर होण्याची दाट शक्यता आहेत.

visit : Policenama.com