जितेंद्र आव्हाडांच्या प्रोफाईलवर PM मोदींचा फोटो ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं फेसबुकवर एक अकाऊंट असल्याचं दिसून आलं. या अकाऊंटच्या प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहायला मिळत आहे. परंतु हे आव्हाड यांचं अधिकृत अकाऊंट नसल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द आव्हाडांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. या अकाऊंटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत हे अकाऊंट फेक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या नावाच्या फेक फेसबुक अकाऊंटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलं आहे की, “हे फेक अकाऊंट असून याचा चुकीचा वापर केला जात आहे. या फेक अकाऊंटची तक्रार मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र सायबर सेल, ठाणे पोलिसांकडे केली आहे.” असंही आव्हाडांनी सांगितलं आहे.
This is a fake account and is being misused
I m reporting to @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaCyber1 @ThaneCityPolice pic.twitter.com/huhyHRysvB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 6, 2020
आव्हाडांच्या नावानं असलेल्या याच फेक अकाऊंटच्या प्रोईलला आणि कव्हर फोटोला असा दोन्हीकडेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. त्या युजरनं त्याची प्रोफाईल लॉक केल्याचंही स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. आव्हाडांच्या नावानं असलेल्या या अकाऊंटचा गैरवापर होत आहे हे सांगत त्यांनी आता या अकाऊंबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे.