…तरीही यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा ‘बालेकिल्‍ला’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काल रात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रातील मोठे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

टीका करताना आव्हाड म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतक्या नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे, हे पाहता दोन्ही पक्षांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून आमदार आणि नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत, त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून भाजप आणि शिवसेनेला टोला हाणला आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1172724032950521856

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, एकदा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी झम्प्या आतमध्ये गेला असता तिथे उदयनराजे भोसले, भास्कर जाधव, सचिन अहिर, गणेश नाईक आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला कि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, साहेब उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केले मात्र तुम्हाला काय मिळाले. तुम्ही त्यांच्यासाठी जवळच्या लोकांना दुखावलंत, त्यांच्या बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं. मात्र त्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले ? असा प्रश्नदेखील त्यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे. ‘ …तरीही यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्‍ला’ असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या