…तर राष्ट्रवादीवर ‘ही’ वेळ आली नसती, माजी प्रदेशाध्यक्षांचा पक्षाला घरचा ‘आहेर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. सकाळी ११ वाजता अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधत पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळी विधानसभेत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनाही यावर प्रतिक्रिया देण्यास सूरूवात केली आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले कि, मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मुंबई शहराध्यक्षपद मागितले होते, मात्र त्यांनी ते दिले नाही. जर मला हे पद दिले असते तर पक्षाची अशी अवस्था झाली नसती अशी खरमरीत टीका देखील त्यांनी आपल्याच पक्षावर केली. त्यामुळे आता पक्षातून जाधव यांच्यावर या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य करताना म्हटले होते कि, ‘काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात. त्याचबरोबर त्यांनी अहिर यांना टोला देखील लगावला.

आरोग्यविषयक वृत्त