धनंजय मुडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला, म्हणाले….

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप केला आहे. मात्र, सरकारने दोन लाखांची कर्जमाफी केली असून दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील कर्जमाफ करणार असल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ‘मी पुन्हा येईन’चे जनक असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गुप्त विकास झाला. हा गुप्त विकास कुणालाच दिसला नाही अशी टीका मुंडे यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’चे जनक असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे या… या… या… असे म्हणत जर देवेंद्र फडणवीस एखाद्याच्या बोकांडी बसले तर काय होईल अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीनंतर 56 आमदार असलेल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले, 54 आमदार असलेल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले 44 आमदार असलेल्या पक्षाचे नेते मंत्री झाले. आणि 105 आमदार असलेल्या पक्षाला विरोधात बसावे लागल्याची टीका भाजपवर केली. भाजपला विरोध करणाऱ्याला सीबीआय आणि इडीची नोटीस पाठवण्यात येत होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांची मग्रुरी जनतेनं मोडित काढल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/