स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण ? कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे म्हणाले…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – नवनियुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी परळीत मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आले होते. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी परळीकरांनी जंगी मिरवणुकीचे आणि नागरीसत्काराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावळी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन मी राजकारणात वाटचाल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याचा आणि परळी मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे ती मी यशस्वीपणे पार पाडेन, असे त्यांनी यावळी सांगितले.

मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीत आले होते. त्यापूर्वी त्यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. पळीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. चार तास चाललेल्या या मिरवणुकीनंतर त्यांनी व्यासपीठावरून संपूर्ण परळीकरांचे आभार मानले. तसेच जनतेचे उपकार मी कधीही विसरु शकणार नाही असे सांगत ते वडील पंडीत आण्णा मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते बीडमध्ये वास्तव्यास होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, भगवान बाबांच्या पुण्यतिथी दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांनी रक्ताचे नाते तोडण्याची भाषा केली होती. पक्षात काहीच स्थान राहिले नसल्याने मी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. एवढेच नाहीतर बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून मी पाच वर्षे बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात फिरलो. त्यानंतर आता ही जबाबदारी आली असल्याचे सांगते ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/