कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते भेदरलेल्या स्थितीत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असून त्यांच्या जहागिरीला भाजपाने सुरूंग लावल्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आता भेदरलेल्या स्थितीत आहेत. भाजप विकासकामामुळे लोकप्रिय होत चालली आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उंब्रज, ता. कराड येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, आजच्या या कार्यक्रमाने विरोधकांची झोप उडणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाला कर्तृत्वाप्रमाणे जबाबदारी दिली जाईल. सामान्य माणसाच्या हितासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. मराठा आरक्षण, सिंचन योजना, जलयुक्त शिवार यामुळे हरितक्रांती झाली आहे.आमदारांनी भ्रमनिरास केला आहे.

उंब्रजसारख्या निमशहरी भागात शासकीय कार्यालये, शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोयीसुविधांची कामे करणे अवघड झाले असल्यामुळे लवकरच नगरपंचायत व्हावी यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. गावासह विभागाचा विकास करण्याचे काम सुरु असून विकासावर राजकारण करणे ही भाजपाची प्रथा आहे. पक्षाने कार्यकर्त्याला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची स्पर्धा सुरू आहे. प्रमुख राज्ये भाजपाच्या अधिपत्याखाली असून सर्वसामान्यांना सुखी ठेवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले जात असल्यामुळे आमचा पक्ष लोकप्रिय होत आहे.

विरोधकांनी संघर्ष यात्रा, हल्लाबोल यात्रा काढल्या. या दरम्यान निवडणुका झाल्या, त्यामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे. विकासाच्या माध्यमातून आमचा पक्ष सर्वसामान्यांकडे मते मागत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास या कार्यक्रमाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, जिल्हा दक्षता समिती सदस्य प्रसाद देटके यांच्यासह उंब्रज व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.