राष्ट्रवादीचे एवढे खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान

माजीद मेमन यांचं वक्तव्य

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे १० पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर शरद पवार हेच देशाचे पंतप्रधान होतील. आघाडीचे सराकर स्थापन करण्याची वेळ आल्यास शरद पवार यांचेच नाव आघाडीवर असेल. असा विश्वास मेमन यांनी व्यक्त केला आहे. अकोला येथे प्रचारासाठी आल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे भाकित केले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी माजीद मेनन अकोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्या आमच्या पक्षाकडे खासदार जास्त नाहीत. दुर्दैवाने आमचा पक्ष तेवढा मोठा नाही. २ ते ३ खासदार असताना दैवेगौडा पंतप्रधान बनले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार निवडून आल्यास शरद पवारच पंतप्रधान होतील. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. संसदेत कामकाज स्थगित झाले तर सर्व नेते त्यांच्या जवळ जमतात. असे ते म्हणाले.