शरद पवार ICC चे अध्यक्ष होते हे नितीन गडकरी विसरले वाटतं, ‘केलं ना क्लिन बोल्ड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडी लवकरच नवे सरकार स्थापन करेल. आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मलिक यांनी ट्विट करत भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शरद पवार हे बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. हे नितीन गडकरी विसरले होते,  केला ना पवार साहेबांनी क्लीन बोल्ड !

नितीन गडकरी यांनी भाजप पिछाडीवर जात असल्याचे पाहून राजकारण आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर 23 तारखेला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हा देखील नितीन गडकरी म्हणाले की मी सांगितलं होतं राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते, मला काय म्हणायचे होते हे आज तुम्हाला कळालं असेल.

त्यानंतर राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस मोहिम सुरु करण्यात आली. परंतू शरद पवारांच्या राजकीय खेळीपुढे भाजपचा टिकाव लागू शकला नाही.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आणि दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यानंतर भाजप बॅकफूटवर आले. पुरेशा संख्याबळाआभावी भाजपचे सरकार कोसळले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले की भाजप नेते गडकरी म्हणाले होती की राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतू ते विसरले वाटत की शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. केला ना क्लिन बोल्ड !

Visit : Policenama.com