NCP MLA Sunil Tingre | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका अ‍ॅकशन मोडवर ! आमदार टिंगरे यांच्या उपोषनाला यश; भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MLA Sunil Tingre | वडगाव शेरी मतदारसंघातील (Vadgaon Sheri Assembly constituency) प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या उपोषनानंतर महापालिका प्रशासन Pune Municipal Corporation (PMC) लगेच कामाला लागले आहे. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Vikas Dhakane) यांनी आमदार टिंगरे यांनी मांडलेल्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच त्यावर कार्यवाहीचे निर्देश संबधित अधिकार्‍यांना दिले. याशिवाय पोरवाल रस्त्यांच्या समातंर रस्त्यावरील भिंत पाडून आमदार टिंगरे यांनीही कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. (NCP MLA Sunil Tingre)

 

   

 

मतदारसंघातील वाहतुक कोंडी, रखडलेले रस्ते, उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनिल टिंगरे यांनी गुरूवारी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेऊन प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच महापालिकेची यंत्रणा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागली. पालिका अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रखडलेल्या कामांची पाहणी केली. तसेच संबधित अधिकार्‍यांनाही त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. (NCP MLA Sunil Tingre)

 

कामांची अति. आयुक्तांनी केली पाहणी
अति. आयुक्त ढाकणे यांनी विमानतळ रस्त्यावरील 509 चौकातील रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी चौकातील बुध्दविहार स्थलांतरीत केल्या जाणार्‍या पर्यायी जागेची पाहणी करून संबधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या. त्यानंतर धानोरीतील लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशान भुमी या रस्त्यांची पाहणी केली. त्यासंबधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी जागेवर संबधितांना दिले. पुढे त्यांनी धानोरीतील सर्व्हे. न. 5 ते 12 जागेची पाहणी करून त्यासंदर्भात पुढील आठवड्यातच संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत तसेच वन विभागाच्या जागेसंदर्भात बैठकिचे आयोजन केले जाईल असे सांगितले. यावेळी अति आयुक्त ढकणे यांनी लोहगावच्या पाणी पुरवठ्याबाबत येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबविली जाईल असेही सांगितले. तसेच नगर रस्ता बीआरटी काढण्याबाबत वाहतुक पोलिस आणि पीएमपी समवेत बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही केली जाईल आणि नदीकाठचा रखडलेला नदीकाठच्या ज्या जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत, त्याबाबत घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाबाबत येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

 

अन् आमदारांनी भिंत तोंडून रस्ताच केला मोकळा
धानोरीतील पोरवाल रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा गंभीर झालेला प्रश्नही आमदार टिंगरे यांनी हाती घेतला आहे. या रस्त्याला पर्यायी समांतर जो रस्ता होत आहे. त्यावर मार्थोफिलिप्स शाळेजवळ असलेली भिंत आमदार टिंगरे यांनी जेसीबी बोलावून तोडली आणि स्वत: त्यावरून गाडी घेऊन जात हा रस्ता मोक़ळा केला. या रस्त्यावरही येत्या आठ दिवसात डांबरीकरण केले जाईल असे उपस्थित पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

 

 

या वेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विसास ढाकणे, उपायुक्त किशोरी शिंदे,
सहायक आयुक्त नामदेव बजबलकर, अधिक्षक अभियंता मीरा सबनीस,
कार्यकारी अभियंता संजय धारव, कनिष्ठ अभियंता शाहिद पठाण उपस्थित होते.

 

 

 

Web Title :- NCP MLA Sunil Tingre | Regarding questions in Vadgaon Sherry, the municipality is on action mode! Success to MLA Tingre’s fasting; MLAs cleared the road by facing the wall

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान